shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोफत डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप ..!आरोग्यम धनसंपदा फाऊंडेशन आणि बुधराणी हॉस्पिटलचा उल्लेखनीय उपक्रम..!!

प्रतिनिधी । आसावरी वायकर :-

करमाळा (दि .७) :आरोग्यम् धनसंपदा फौंडेशन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा करमाळा तालुका आणि बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा शहरातील सिद्धार्थ नगर येथे मोतीबिंदू , काचबिंदू , तिरळेपणा, डोळ्यातून पाणी येणे,  लासरू व नंबर काढणे आणि अल्पदरात चष्मे वाटप करणे यासाठी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदरील शिबिराचे उद्घाटन करमाळा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी केले त्याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले .

या शिबिराचा 74 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत प्रेमा कांबळे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सिद्धार्थ नगर विभागातील विद्यमान नगरसेविका प्रमिला (काकू) मुकुंद कांबळे उपस्थित होत्या.

या कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग चे पालन करून आणि मास्क व सॅनिटायझर चा वापर करून सदरील कार्यक्रमात गरजू रूग्णांनी सहभाग घेतला होता.

 आरोग्यम् धनसंपदा चे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सदरील कार्यक्रम घेण्यात आला.

डोळे तपासणी शिबीर आणि आरोग्याची काळजी घेणारे कार्यक्रम संपूर्ण करमाळा शहर तालुका आणि आसपासच्या तालुक्यात तसेच जिल्ह्यात घेण्याचा मनोदय किसन कांबळे तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना करमाळा तालुका शाखा यांनी व्यक्त केला.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य प्रशांत कांबळे यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयवंत उर्फ आप्पा कांबळे यांनी प्रयत्न केले...
close