प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी :-
नायगाव येथील आदिवासी व गोरगरीब लोकांना लोक अन्नधान्याचे पाकिट वाटप करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून सगळ्यांना किट देण्यात आले.
फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण निचित व त्यांची पत्नी अनुजा निचत यांच्या हस्ते व सहकारी यांच्या हस्ते पुणे येथील नायगाव परिसरात परिसरातील गोर गरीब लोकांना च्या कोरोणाच्या काळात या कोरूना च्या काळात जेथे सर्वत्र लॉक डाऊन ची परिस्थिती असून रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम नसल्याने ते अत्यंत हालाखीचे जीवन व्यतीत करीत आहेत. अशा लोकांना होप फाउंडेशन तर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून अन्नधान्याचे वाटप केले आहे.
निसर्ग उपचार तज्ञ असून हे बदलापूर मध्ये सुपरिचित आहेत. ते घरगुती उपचाराद्वारे समाजाची सेवा, आरोग्य शिबीर द्वारे करतात.होप फाउंडेशन ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारी सेवाभावी संस्था असून इतरही समाजकार्यात त्या संस्थेचा सहभाग असतोच .
2019 मध्ये जेव्हा पूर आलेला त्यावेळी सुद्धा या संस्थेने आपला पुढाकार घेऊन बहुतांश लोकांना मदतीचा हात दिलेला आहे.नेहमी अशा आपत्कालीन समयी समाजाप्रती जागृकता व जिव्हाळा असणारे डॉक्टर प्रविण निचत व त्यांची धर्मपत्नी सढळ हाताने समाजाला आपला मदतीचा हात पुढे करतात. त्यांची स्वतःची परिस्थिती जेमतेम असतानादेखील समाजाविषयी वाटणारा कळवळा त्यांना गप्प बसू देत नाही. ते या ना त्या कारणाने यांना समाजाला मदत करत असतात.
त्यांच्या अशाच कार्यामुळे त्यांना जवळपास 97 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2019 ला होप फाउंडेशन ला सी एस आर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. होम फाउंडेशन ही संस्था शेतकऱ्यांच्या समस्या व तळागाळातील गोरगरीब लोकांना मदत करत असते. या संस्थेमार्फत समाजाच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले. संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले, सुजाता ज्ञानदेव भोसले, सुरेखा तुकाराम भोसले, समजसेविका भूमी जनशक्ती किसान /शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे महासचिव ज्ञानदेव शिलेदार भोसले, शेवराबाई ज्ञानदेव भोसले, बंटी काळे, शुभांगी काळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

