प्रतिनिधी । आसावरी वायकर :
मांडवे (दि .५) :गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत आज नगर तालुक्यातील मांडवे येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन तसेच RT-PCR टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच सुभाषराव निमसे,उपसरपंच संजयजी निमसे,दै.पुढारीचे संपादक ज्ञानेश्वर निमसे,सोसायटी संचालक विलासराव निमसे,बाळासाहेब मोहन निमसे,भाजपा नेते महेश वाघ,प्रशांत कांबळे हे उपस्थित होते.
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी CHO डॉ.पुनम दातीर,सुपरव्हायजर सरोजिनी देठे,सुनिता जाधव,आरोग्यसेवक अनिल रायपिल्ले,डेव्हिड वाघमारे,ग्रामसेवक देहाडे भाऊसाहेब,आशा सेविका सविता निमसे,अनिता गांगर्डे,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

