प्रतिनिधी । संजय वायकर :
करमाळा : (दि .५) : पुर्व भागातील सिना कोळेगाव धरणावरील, हिवरे,निमगाव, कोळगाव, गौंडरे,आवाटी,लावंड वस्ती हिसरे,या गावांना फेब्रुवारीपासून ते आज अखेर पर्यंत महावितरण ने फक्त चारच तास विजपुरवठा केला आहे तसेच या कालावधीत वाडीवस्तीवरील सिंगलफेज देखील पुर्ण पणे बंद आहे,वारंवार मागणी करुन देखील महावितरण ने फक्त आश्वासनाचे गाजर दाखवल्याने अनेक शेतकऱ्यांची उभी पिके जळुन गेली आहेत .
अगोदरच नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना फेब्रुवारीपासून चारच तास विज उपलब्ध करुन दिली असल्याने, फेब्रुवारी ते आठ तास विज उपलब्ध होई पर्यंत च्या कालावधीतील विज बिले हि चारच तासाची घ्यावीत अन्यथा पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या वतीने भव्य आंदोलन व कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे महावितरणला दिला आहे.
या बाबत अधिक माहिती देताना शाहुराव फरतडे म्हणाले की वास्तविक महावितरणने शेतकऱ्यांना चोवीस तास विज उपलब्ध करुन देण्याचा करार केला असूनही आठच तास विजपुरवठा करुन शंभर टक्के विज बिल आकारणी करत आहेत .
पुर्व भागात मात्र महावितरण च्या ढिसाळ व चुकीच्या नियोजनामुळे पाच महिन्यांपासून फक्त चारच तास विजपुरवठा होत आहे ,त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या विजबिलात संपूर्ण पणे पन्नास टक्के कपात करण्यात येवुन विज बिल दुरुस्त करुन पन्नास टक्के विज बिल माफ करत असल्याचे लेखी
आश्वासन द्यावे .
तसेच 2012 पासुन वेळोवेळी पडलेल्या दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विज पुरवठा पुर्ण पणे बंद होता, व दोन वेळा सिना कोळेगाव धरणात एकही थेंब पाणी नसल्याने शेती पंप पुर्ण पणे बंद होते तरी देखील या कालावधीतील विज बिले पुर्ण वेळेची आकारुन दंड व्याज देखील लावल्याने शेतकऱ्यांच्या विजबिलात भरमसाठ वाढ झाली आहे तरी सदरचे काळातील संपूर्ण विज बिल माफ करावे अन्यथा महावितरण विरोधात करार भंगाचे, व ग्राहकांच्या बिलात वाढ करुन दिवसाढवळ्या लुट केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलनाबरोबरच कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फरतडे यांनी सांगितले.

