नगर । प्रतिनिधी ( संजय वायकर):
जेष्ठ तज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लवकरच येण्याची शक्यता असून तिसरी लाट बालकांना जास्त घातक असल्याचे सांगण्यात येत आहे. याचीच दखल म्हणून भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटीलचे सरपंच मनोजभाऊ कोकाटे यांच्या पुढाकाराने चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयात संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयात बालकांसाठी एक स्वतंत्र आयसीयू वॉर्ड व दोन जनरल वॉर्ड उभारले जाणार असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
चिचोंडी पाटीलसह परिसरातील ग्रामस्थांनी शक्य होईल तेवढी काळजी घ्यावी व घरातील लहान बालकास कुठल्याही प्रकारची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब चिचोंडी पाटील ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करण्याचे आव्हान कोकाटे यांनी ग्रामस्थांना केले आहे.

