shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"सामाजिक बांधिलकी जपविणारा काव्य संग्रह. " "जीवन संघर्ष "..!!

(पुस्तक  परिक्षण लेखक :- मुबारक उमराणी,) 

 कवी नवनाथ रणखांबे यांचा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. त्याच्या कविता वाचतांना त्याच्या जीवनसंघर्षाची झलक प्रत्येक कवितेतून दिसून येते

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरावरती असीम श्रध्दा बाबांच्या प्रज्ञा प्रकाशाने  शिक्षण दीपाच्या प्रकाशातच कवीचे जीवन तेजोमय झाले आहे. बाबांचे, पित्याचे, आईचे, गावचे, संस्कारीत करणाऱ्या प्रत्येकाचे ऋण उरी घेऊनच जीवनाची वाटचाल करीत आहेत. 

शिका संघटीत व्हा, ही प्रेरणा घेऊन बुध्दांचा समतामुलुक अष्टांग.  मार्ग, प्रज्ञा, शील, करुणा, अत्त, दिप,भव हे भाव कवीच्या रगारगात ठासून भरले आहे.  म्हणून संकटाच्या वादळ वा-याने, त्सुनामीने तो विचलित होत नाही तर फिनिक्स पक्षासारखा साहित्यात तो झेप घेतो.  

बाबांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी, आईच्या तळहातावरील कष्टाळू फोडाची जाणीव कवीला आहे. तो सामाजसिक बांधिलकी, पत्नीची साथ विसरत नाही. म्हणूनच समाजातील अन्याय अत्याचार, दंभाचार, भ्रष्टाचार,  स्त्रीयांची अवहेलाना हे  कवी मनाच्या चक्षुतुन सुटत नाहीत. तो बेधडक आपल्या मनातील तळमळ कवितेतून मांडतो.

रणखांबे याच्या कविता या मुक्त छंदात असून कवितेच्या विषयाची मांडणी करतांना कविने काव्याच्या विषयाला पूर्णपणे न्याय दिला आहे.

माय तुला पाहलय, या कवितेत अन्यायानी पेटलेल्या गेहीचे घर उसवतांना, आभाळ फाटतांना, उपासमारीतही हिंम्मत देतांना, जनावरांची काळजी घेतांना कष्टाचं डोंगर उचलतांना, जीवनसंग्राम लढायला शिकवणाऱ्या आईस कवी पाहतो. माजोरा पाऊस अनेक दुःखे  शेतक-याला पाहून तो अस्वस्थ होतो. बेचैन होतो. झाडे तोडण्या-या विरूद्ध बंड करतो. पर्यावरणाच्या -हासाने ओझन मरतांना पहातो. कवी मन पर्यावणाचे रक्षण केलेच पाहिजे हे निक्षून सांगतो.

"जा पोरा जा तू "  हा आदेश घेऊन तो गाव सोडून मुंबईत येतो. अन् भीमाच्या मंत्राचे शिक्षाणाच्या वाघीनेच दूध प्राशन करूनच अन्यायाविरिधी तो गुरगुरायला लागतो.

भटकंती करणारे वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी, नंदीबैलवाले, या वंचित समाजानेही सुधारणेची मशाल हाती धरावी असे कवीला वाटते.

अंधश्रध्दे बद्दल त्यांना चिड आहे.  हे किती दिवस अशा या चिखलात पडायचे खिचपत. चिखलातून फुलायला शिकले पाहिजे . भेदभाव हा मानवतेला लागलेला डाग आहे. स्वतःला आता दलित म्हणून घेऊ नका असे तळमळीने सांगतो.

जीवन संघर्ष ही कविताच बरच काही सांगून जाते.

" जीवन संघर्ष यात्रा.....
जगण्याची पोतराजाच्या वेशासारखी
रंगबेरंगी फाटक्या कापलेल्या
कापडा सारखी जीवनाची !"

म्हणूनच संग्रहाला दिलेले नाव सार्थक होते.
       
जातीचे ग्रहण, स्वतःचा शोध, डाॅ.आंबेडकर, बापाचं नाव लावायचं टाळलंस, थरकाप, मोडेल कणा, माणवतेला डाग.  या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत. प्रत्येकवेळी त्याचा आशय वेगळ्या स्वरूपात डोळ्यापुढे येतो. आपण कवितांचे वाचन ज्या प्ररणेने करतो त्याच प्रेरणाची झलक कवितेतून आपोआप बाहेर येते.

अवतीभोवती दिसणारी अनेक दुःखे कवीचे कवितेचे विषय होतात ते तितक्याच समर्पक शब्दांत त्यांना मांडून समाजाला मनाला जाग्रत करण्याचा प्रयत्न करतो. यात कवी नवनाथ रणखांबे यशस्वी होतात.

अडचणींशी , संकटांशी लढतांना नेहमी जाग्रत राहून त्यास लढण्यास सज्ज होऊनच स्वतःचे अस्तित्व आणि गुणतितक्याच प्रखरतेंने दाखवतो.
      
"जीवन संघर्ष "हा कविता संग्रह नवनाथ रणखांबे यांचा असून शारदा प्रकाशन संस्थेच्या प्रा.संतोष राणे यांनी नौपाडा ठाणे -२ येथून प्रसिद्ध केले आहे. याचे स्वागत मुल्य ८० रुपये इतके नाममात्र आहे .

या कविता संग्रहात ४६  कविता असून अनेक विषयाशी  त्या कविता निगडीत आहेत. हा कविता संग्रह एकदा वाचकांनी वाचावा असा आहे. तो जरुर संग्रही ठेवण्यासारखा कविता संग्रह आहे.

मराठी सारस्वत या कविता संग्राहाचे असपुलकिने स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो.  श्री नवनाथ रणखांबे यांनी साहित्याचा प्रवासास न सोडता सतत लेखन करुन त्यांच्या मनातील असणारे साहित्याचे लेखन करुन. साहित्याची सेवा करुन डाॅ. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न कवीने करावा असे वाटते. त्याच्या पुढील साहित्यिक लेखमाला हार्दिक शुभेच्छा देतो.

हा साहित्यिक स्नेह असाच वृध्दीगत होवो हीच अपेक्षा!

(लेखन
मुबारक उमराणी,
 सांगली
 ९७६६०८१०९६.)
close