प्रतिनिधी । आसावरी वायकर :
शेवगाव : (दि . 6 ) : ग्रामीण रुग्णालय शेवगाव या ठिकाणी 45 वर्ष व यापुढील नागरिकांसाठी COVACCINE या लसीचा दुसरा डोस उद्या 7 जून रोजी देण्यात येणार आहे . एकूण 130 डोस उपलब्ध झाले आहेत .
माननीय संचालक डॉ. अर्चना पाटील मॅडम यांनी काल दिलेल्या आदेशान्वये महसूल ,नगर परिषद आणि पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या लसीचा पहिला डोस मिळेल.
तसेच 45 वर्ष वयाच्या आतील HCW/FLW यांना या लसीचा दुसरा डोस मिळेल .
वय वर्ष 18 ते 44 या वयोगटातील इतर नागरिकांनी पहिला किंवा दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ नये असे सांगण्यात आले आहे .
टोकन वाटप सकाळी आठ वाजता चालू होईल .
ज्यांना टोकन मिळाले आहे त्या सर्वांना rt-pcr टेस्ट करणे बंधनकारक असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

