shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; पत्रकारांचा स्तुत्य उपक्रम.

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; पत्रकारांचा स्तुत्य उपक्रम.

इंदापूर प्रतिनिधी:सध्या सर्वत्र कोरोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव आहे. या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा न करता, केक, पार्टीचे आयोजन न करता उद्भवलेल्या परिस्थितीचे भान ठेवून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत समाजासमोर एक आदर्श ठेवला.

दै .जनप्रवासचे इंदापूर तालुका प्रतिनिधी श्री . काकासाहेब मांढरे, पत्रकार अंगद तावरे तसेच नानासाहेब घळके यांचा वाढदिवस होता. याचे औचित्य साधत माऊली अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष डाॅ. संदेश शहा, शहराध्यक्ष सुरेश जकाते, संपादक विलासराव गाढवे, सचिव धनंजय कळमकर तसेच अॅड. नारायण ढावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर येथील माऊली बालक अनाथाश्रमात जीवनावश्यक किराणा सामानाचे वाटप केले.

यावेळी समन्वयक दिपक खिलारे, सदस्य कैलास पवार, , तात्याराम पवार, हमीद आतार, माऊली नाचण उपस्थित होते.
close