(सरस्वती महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण)
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
वृक्ष लागवड करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी पालकतत्व घेण्याची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.
ही जबाबदारी घेण्यातच आपण अपयशी ठरत आहोत. म्हणूनच वृक्षसंवर्धनात यश मिळताना दिसत नाही असे प्रतिपादन प्राचार्य हनुमंत सौदागर यांनी केले ते केज येथील सरस्वती महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पाटील जी. बी. हे होते. यावेळी डॉ अलका डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. प्राचार्य डॉ पाटील म्हणाले, मानवाला शुद्ध ऑक्सिजनची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याची ताकद फक्त वृक्षांमध्ये असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ जाधव जे. के. प्रास्ताविक डॉ नागेश कराळे तर आभार स्वयंसेवक उन्मेश नेहरकर यांनी मानले. यावेळी प्रा डॉ वैशाली आहेर, प्रा. हरिदास शिंदे, प्रा डॉ लक्ष्मण तोंडाकुर, श्री अविनाश गालफाडे, श्रीमती लता भांडवलकर,अश्रूबा इटकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंसेवक अमृता घोडकेे, जीशान कुरेशी, आकाश घुलेे, मेघराज कदम यांनी परिश्रम घेतले.

