shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहार जनशक्ती पक्ष संगमनेर यांच्या वतीने गोरगरिबांना किराण्याचे वाटप..!

शिर्डी । प्रतिनिधी : 
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातुन करोना काळात झोळे गावातील सर्वसामान्य गरीब निराधार 108 कुटुंबांना भाजीपाला ( मिरची ,घोसाळे, टोमँटो, वांगी, बटाटे ,भेंडी ,गवती चहा ,ढोबळी मिरची, कांदे , गोरानी शेंग ) हे सर्व मा. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीपभाऊ थोरात व प्रहार जनशक्ती पक्षाचे संगमनेर शहर अध्यक्ष तथा झोळे ग्रामपंचायत सदस्य उद्धव वाळे यांच्या वतीने मोफत घरपोहच भाजीपाला व सॅनिटायझर बॉटल वाटप करण्यात आले. 

या सामाजिक कार्यात मोलाचे सहकार्य ज्ञानेश्वर सखाराम वाळे यांचे खूप मोलाचे सह कार्य लाभले. जिल्हा संघटक श्री.अभिजीत कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजीत भाऊ पाचोरे, प्रहार तालुका संघटक खंडू खर्डे, सर्प मित्र सुनील कुडेकर, जालिंदर खर्डे, प्रवीण खर्डे, गणेश राहाने, सौरभ वाळे, संदीप वाळे, सागर एरंडे, ओम वाकचौरे, रोहित भालेराव ,सुरज येवले, सचिन वाळे यांनी खुप मदत केली. या कामाचे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
close