प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई- गेल्या आठवड्यापासून सोनई व परिसरात चोरट्यानी नागरिकांना जणू आव्हाहन दिले होते की काय? त्या पद्धतीने दरोरोज कुठे ना कुठे चोरी, नागरिकांना हाणामार,तसेच रस्त्यावर लूटमार,आदी प्रकार घडत असल्याने गावात दहशत पसरली होती.
त्यामुळे सोनई पोलीस प्रशासन व ग्रामसुरक्षा दल तुकडीने दरोरोज रात्रभर पहारा देत आज सकाळी सफारी ( एम.पी.०४ -सी.जी.२०९७ )या वाहनसह सहा जण संशयित चोरटे मोरया चिंचोरे शिवारात पकडले गेले आहेत. ते सर्व मध्यप्रदेश राज्यातील सजापूर जिल्ह्यातील तरुण रहिवासी आहेत.
या बाबत माहिती अशी की,चोरट्यानी गावात येऊन अनेक ठिकाणी घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करत प्रसंगी नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे गावात दहशत निर्माण झाली होती, आज सकाळीच बस स्थानक परिसरात या चोरट्यानी चिकन व काही खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी आले असता सतर्क नागरिकांनी एकमेकांना माहिती देऊन त्या गाडीचा पाठलाग करून चोरटे वाहनसह पकडले गेले आहे. त्यांच्या कडून जवळपास ५००/६०० लिटर डिझेल हस्तगत करण्यात आले आहे.आज त्याची बाजारभाव प्रमाणे ५००००/- रु किंमत होत आहे.
या कामी गावातील महेश तरुण मंडळाचे सदस्य महेश म्हस्के, सचिन चादघोडे,शैलेश दरदले, आदीनी पाळत ठेऊन यश मित्र मंडळाचे कार्यकर्ते माजी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुगळे,विजय मनोरे,आदींसह पोलीस ठाण्याचे स.पो. नि.रामचंद्र कर्पे हे आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन चोरटे ताब्यात घेऊन त्यांचा इतर कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का? याची पोलीस माहिती घेत आहे. हे तरुण २०/२५ वयोगटातील आहे.धर्मेंद्र शिवणारायन सोळंकी,अजय दिनेश मालवीय,सलीम मोहमद खान,राकेश रामलाल सोळंकी, मिथुन शिवणारायन सोळंकी,अशोक रामचंद्र मालवीय, हे संशयित आरोपीची नावे दिली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून,मा.पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे व शेवंगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि.रामचंद्र कर्पे हे अधिक तपास करत आहे.

