जिल्हा प्रशासन सज्ज
➡️पर्यावरण संवर्धनासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. येत्या वटपौर्णिमेपासून दिनांक -२४ जुन रोजी जिल्ह्यात 'एक व्यक्ती-एक झाड' अभियान राबविले जाणार आहे.
⚡जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि सक्रीय सहभाग याबरोबरच स्वयंसेवी संस्था, विविध पदाधिकारी यांच्यासह लोकसहभाग यामध्ये घेतला जाणार आहे असे सांगितले.
🌳 मुख्यत्वे वडाच्या रोपांची लागवड ⏺️
नगर परिषद, नगरपंचायत हद्दीत लोकसहभागातून सहा लाख ७० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या रोप लागवडीने या अभियानाची सुरुवात होईल.
✅🌱 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट खालील प्रमाणे👇🏻
✳️श्रीरामपूर नगर परिषद ९० हजार
✳️संगमनेर ९० हजार
✳️कोपरगांव ९० हजार
✳️राहुरी ५० हजार
✳️देवळाली प्रवरा ४० हजार
✳️राहाता ३० हजार
✳️पाथर्डी ३० हजार
✳️श्रीगोंदा ३५ हजार
✳️शेवगांव ४० हजार
✳️जामखेड ४० हजार
✳️शिर्डी नगरपंचायत ४० हजार
✳️अकोले २० हजार
✳️कर्जत ३० हजार
✳️पारनेर २० हजार
✳️नेवासा २५ हजार
➡️दिपक हरिश्चंद्रे (प्रतिनिधी-वांबोरी)

