अ .नगर :(दि .१९ ) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन.
राज्यात कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच कोरोना काळात महत्त्वाची भुमिका पार पाडणाऱ्या आशावर्कर यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री .दिलीप सातपुते , श्री .संभाजी कदम , श्री .विक्रम राठोड, श्री . गणेश कवडे , श्री .अनिल बोरुडे , श्री . बाळासाहेब बोराटे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .
शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांशी संवाद साधला .
यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

