प्रतिनिधी : आसावरी वायकर
अहमदनगर : "सोने की साईकिल चाँदी की सिट
आओ चले डार्लिंग चले डबलसिट " ...!
प्रेमिकांना या गाण्याची आज सहज आठवण करून द्यावी असे वाटले. खरंच सायकल चे महत्व आरोग्यासाठी आज आपण ओळखून बसलो आहोत.
सायकलचा शोध १८१७ मध्ये कार्ल ड्रेस नावाच्या जर्मन माणसाने लावला.
मंडळींनो आज जागतिक सायकल दिवस 🚲🚲 . सायकलची उपयुक्तता ओळखण्यासाठी तसेच त्याचा प्रसार होण्यासाठी जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो. सायकल चालविण्याचे आरोग्याचे फायदे तर आपल्याला माहित आहेच. हृदय रोग, स्ट्रोक, कर्करोग, मधुमेह यासारख्या आजार असणाऱ्या मंडळींनी किमान ३० मिनिटे सायकल चालवावी.
दुसरा फायदा प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होते.
झोप लागत नाही- फक्त तीस मिनिटे सायकल चालवा.
मेंदू तल्लख करायचाय- फक्त तीस मिनिटे सायकल चालवा.रोग प्रतिकार शक्ती वाढवायची- फक्त तीस मिनिटे सायकल चालवा.अनावश्यक चरबी हटवायची- फक्त तीस मिनिटे सायकल चालवा.
सायकल वरून आठवलं कोविड काळात एका मुलीने आपल्या आजारी वडिलांना घेऊन हजार किलोमीटरचा प्रवास सायकल वरून केला खरंच या मुलीला एक मनापासून सलाम !
असं म्हणतात गाडी चालवतानाची पहिली पायरी सायकल आत्मविश्वासाची पहिली पायरी सायकल
धडपडताना उठून परत उभे राहायचे ही शिकवण देणारी पहिली पायरी म्हणजे सायकल...!
मध्यंतरी सायकल नावाचा एक मराठी चित्रपटही येऊन गेला.संदीप खरे यांची सायकल एक हृदयस्पर्शी कविता खरच ऐकून पहा-
"गरिबांच्या संसाराला
सायकल देई साथ
श्रीमंतांच्या पंगतीला
मात्र आरोग्याचा हात"🚲🚲
सायकल एक निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे असे म्हणायला हरकत नाही.
आज पासून चालवूया सायकल स्वारी तीस मिनिटांची.
🚲🚲 ट्रिंग ट्रिंग
( अनुरिता झगडे यांचे लेखनीतून ... )

