shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्राच्या आदर्श घरभाडे कायदा 2021 ला महाराष्ट्रातून पहिला विरोध संगमनेरातून...!


कॅबिनेट कडून टेनंसी एक्ट या कायद्याला मंजुरी मिळताच महाराष्ट्रातून संगमनेर शहरातून माहिती प्रवाह ट्रस्ट व्दारे या निर्णयाला विरोध करण्यात आला.

संगमनेर- प्रतिनिधी :
श्री अब्दुल्लाह  चौधरी , श्री शिसोदे सर, श्री मोहम्मद तांबोळी, श्री दस्तगीर शाह, श्री शानू बेगमपुरे, श्री मुदस्सर शेख, श्री मोहसिन मनियार यांनी संगमनेर बस स्थानक चौकात एकत्र  येवून केंद्र शासनाविरोधात घोषणा दिल्या व कायद्याची होळी केली.

या कायद्याने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या मोठया महानगरात चाळकरी बेघर होणार आहेत.

घर मालकाला हुकुमशाहीचे अधिकार मिळतील.

दोन महिन्याचे भाडे न दिल्यास घर खाली करण्याचे अधिकार, भाडे थकल्यास दुप्पट, चौपट भाडे वसुलीचे अधिकार घर मालकाला या कायद्यामुळे मिळतील.

केंद्राच्या आदर्श घरभाडे कायदा 2021 ला महाराष्ट्रातून पहिला विरोध संगमनेरातून...!
close