प्रतिनिधी : आसावरी वायकर
दौंड : (दि.३) : बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड येथे वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे .
उच्च न्यायालयाने त्या अनुषंगाने राज्य सरकारकडे आर्थिक तरतुद व्हावी यासाठी पत्र पाठविले आहे . ही तरतुद लवकर व्हावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड . उदय फडतरे देशमुख यांनी दिले .
यावेळी बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ॲड . माधव अवचर व ॲड . प्रशांत गिरमकर, वैशाली नागवडे उपस्थित होते .

