shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक विभागाचे पोस्टल इन्व्हलप..!!

प्रतिनिधी :संजय वायकर 
नवी दिल्ली :(दि .३) :    लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण मुंडे यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच आज नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे.पी. नड्डा जी यांच्या हस्ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री मा. रविशंकर प्रसाद जी, राज्यमंत्री मा. संजय धोत्रे जी यांच्या उपस्थितीत विमोचन करण्यात आले. 


कार्यक्रमासाठी (व्हर्चुअल) ऑनलाईन द्वारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, श्री.प्रवीणजी दरेकर, श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार,श्री. विनोदजी तावडे, रासपचे अध्यक्ष श्री. महादेव जानकर आणि गोपीनाथ गडावर मा. पंकजाताई मुंडे यांच्यासह खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, खा. डाॅ. भागवत कराड आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले. 

आज रोजी परळी येथील गोपीनाथ गडावरील  समाधीचे  मा.पंकजाताई मुंडे सोबत शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी दर्शन घेतले.
close