shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रिद्धपूर येथे हत्तीपाय रुग्णांना विकृती व्यवस्थापन किट वाटप..!!

अमरावती : प्रतिनिधी:आज दिनांक 03/06/2021 गुरुवार रोजी हत्तीरोग उप पथक नेर पिंगलाई अंतर्गत ग्राम रिद्धपूर येथे मा. डॉ.शरद जोगी सर जिल्हा हिवताप अधिकारी अमरावती व मा. डॉ. जूनैद फैसल सर हत्तीरोग अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीपाय रुग्णांना विकृती व्यवस्थापन किट चे वितरण मा.श्री.दत्ताभाऊ ढोमने जिल्हा परिषद सदस्य अमरावती व मनोजभाऊ कडू यांच्या हस्ते करण्यात आले. 


रिद्धपूर येथील 3रुग्ण, यशवंत पूर येथील 1रुग्ण व बऱ्हाणपूर येथील 3 हत्तीपाय रुग्णांना सदर किट चे वितरण करण्यात आले. आता पर्यंत एकूण 86 किटचे वितरण हत्तीरोग उप पथक नेर पिंग्लाई अंतर्गत करण्यात आले. व्यवस्थापन किट मध्ये प्लास्टिक टप, प्लास्टिक मग, कापूस बंडल, डेटॉल साबण 2 नग,नॅपकिन 2नग,जखमेसाठी मलम,पावडर यांचा समावेश आहे. हत्तीपाय रुग्णांनी किट ्चा वापर कसा करायचा याबाबत श्री.प्रफुल्ल दिवे आरोग्यसेवक यांनी अारोग्यशिक्षण  दिले.

तसेच इतर कीटकजन्य आजार उदा. डेंग्यू, मलेरिया बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.सदर प्रसंगी श्री बाबाराव गवई आरोग्य सहाय्यक,श्री.संदीप भोजने आरोग्यसेवक,श्री.गोकुळ वाको डे आरोग्यसेवक उपस्थित होते.
close