shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसानिमित्त दत्ता आसणे यांनी कोरोना योध्यांचा १ लाखाचा सुरक्षा विमा कडुन सन्मान..!!



शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
कोरोणाच्या संकट काळात आज समाजातील प्रत्येक कुटुंबात स्वतःच्या किंवा नातेवाईकाच्या अकस्मात जाण्याने दुःखत वातावरण आहे त्यामुळे अशा वातावरणात आपल्या वाढदिवसानिमित्त शाल हार-तुरे स्वीकारणे योग्य वाटत नाही परंतु या सर्व कठीण वातावरणात प्रत्येक कुटुंबात आपल्या प्रियजनाचा अंत्यसंस्कार व्यवस्थित व्हावा ही प्रत्येकाची भावना असते परंतु या  महामरीनी त्यावर मर्यादा आल्या आहेत.


तरीही शिर्डी नगरपंचायत च्या वतीने  ज्या व्यक्तींची या अंत्यसंस्कार कामासाठी नेमणूक केली आहे त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता सर्वांचे अंत्यसंस्कार व्यवस्थित करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला हे प्रत्येक शिर्डीकर कधीच विसरणार नाही त्यामुळे आपण वाढदिवसानिमीत्त सन्मान न स्वीकारता या लोकांचा सन्मान करावा या भावनेतून या कोविड योद्धाचा सत्कार सन्मानचिन्ह शाल व एक लाखाचा अपघात विमा या गोष्टी देऊन आकाश शेजवळ दिपक हिवाळे सागर कुराडे परमेश्वर देवरे रवि लोंढे रावसाहेब पवार यांचा अखंड हरिनाम सप्ताह कमिटी शिर्डी साकुरी शिव यांच कडून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सप्ताह कमिटी चे दत्ता आसने यांनी आपल्या राजकीय जीवनातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर करुन धक्काच दिला आपल्या राजकीय वाटचालीत तत्व व निष्ठा याच्याशी कधीही तडजोड न करता रोखठोक व स्पष्ट भूमिका घेऊन सडेतोड राजकारण केले परंतु आत्ताचे राजकारण तत्वाचे व निष्ठेचे राहिले नाही म्हणून राजकारणातून बाहेर पडत असल्याचे सांगितले तसेच तरुणांनी प्रथमता आपले कुटुंब व व्यवसाय नीटनेटका करावा व त्यानंतरच राजकारणामध्ये पडावे हा मोलाचा सल्ला देत सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात समाजाची सेवा कायम करत राहणार असे सांगितले सदर प्रसंगी समाजप्रबोधनकार दत्ता महाराज वैद्य निफाडकर योगेश चौधरी सचिन हनवते रामेश्वर इंगळे नवनाथ आसने धृपद तांबे विलास लासुरे व इतर मित्रपरिवार उपस्थित होते.
close