shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदीत्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना हिंगोली महिला आघाडीच्या वतीने वृक्षारोपण..!!

हिंगोली प्रतिनीधी :(विश्वनाथ देशमुख) 

दि.१३,हिंगोली जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस वृक्षारोपण करुन उत्साहात साजरा करण्यात आला.

 


हिंगोली जिल्ह्याच्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे पर्यटन पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१३ जुन रविवार रोजी हिंगोली येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने कारवाडी ग्रामपंचायत मधील भाग्यनगर येथील अहिल्या भवन परिसरात वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख तथा धनगर समाज युवा मल्हार सेना च्या प्रदेश कार्याध्यक्ष सौ रेखाताई देवकते पाटील,कारवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रियंकाताई खरात धुळगुंडे,प्रणिताताई बालिका ताई शेवाळे,कविताताई दराडे निधी शेवाळे,त्रिशा धुळगुंडे व तसेच शेख आवेज,शिवाजी पातळे सर,धनगर समाज युवा मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संभाजी देवकते पाटील,पांडुरंग ईमडे सर,ज्ञानेश्वर पवन कर ईत्यादी  पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

close