द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021 शो जुलै ला पुणे मध्ये नेवासाची मॉडेल काजल पठाण मुख्य आकर्षण..!!
प्रतिनिधी : सुनिल ज्ञानदेव भोसले
पुणे-: द रॉयल प्रेझेंट च्या वतीने घेण्यात येणारे भव्य-दिव्य मॉडेलिंग शो द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र 2021 ची पुणे मध्ये सध्या तयारी सुरू झाली आहे.हा शो पुणे मध्ये जुलै ला भरविण्यात येणार आहे,अशी माहिती द रॉयल ची मैनेजिंग डायरेक्टर कोमल झगरे यांनी पत्रकारांना दिली.या शो चे रजिष्ट्रेशन सध्या सुरू असून लवकरच हा शो सर्वाना बघायला मिळेल.
या शो मध्ये ब्रँड अम्बेसिडर गौरविण्यात येणार आहे.रॉयल च्या शो ची सर्वाना उस्तुकता लागून आहे. मिस्टर.मिस.मिसेस असे या शो चे स्वरुप आहे.या शो मध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रॉयल ब्रँड अम्बेसिडर रेणुकाताई ठाणगे यांनी केले. पुणे चे यशस्वी उद्योजक मन्नत कोल्हापूरी मळा चे डायरेक्टर पंकज सारसार या शो स्पॉन्सर करत आहे.या शो मधील विजयी स्पर्धकांना फिल्म ,सॉंग मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यार असल्याचे आयोजक नितीन झगरे यांनी सांगितले.
या शो साठी मराठी फिल्म इंडस्ट्री मधील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहे.शो साठी मुख्य आकर्षण म्हणून मराठी सिनेसृष्टितील कलाकार उपस्थित राहणार आहे.हा शो यशस्वी होण्यासाठी संपादक आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उप आध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले ,सभापती डॉ.आशिष रजपूत,सुदर्शन बनसोडे, मिसेस युनिव्हर्स सविता एस.के, रोहित शिंदे, साईप्रसाद,अभिनेते सुरज कुमार,मार्गदर्शक मयुरेश अभ्यंकर सर ,शो चा संपुर्ण मेकअप आणि हेअरस्टाईल मंजू मंजुळकर करणार आहे.
या शो साठी सागर पतंगे,आकाश रणदिवे,तेजस नाईकवाडी,व्यंकटेश कदम ,श्रीदेवी निर्मल ,रश्मी भटनागर, मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे,सुमैय्या पठाण , वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव भोसले,ज्योतिबा ऊबाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.या शो साठी नेवासा ची स्टार मॉडेल काजल पठाण सर्वाचे आकर्षण ठरणार आहे.सेलिब्रेटी गेस्ट म्हणून काजल पठाण उपस्थित राहणार आहे.