वांबोरि प्रतिनिधी । दिपक हरिश्चंद्रे
राहुरी तालुक्यातील सर्पमित्र व वन्यजीव संरक्षक म्हणून ओळखले जाणारे श्री.कृष्णा पोपळघट यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल मा. खा. प्रसादजी तनपुरे साहेब यांनी घेतली व कृष्णा पोपळघट व सहकारी सर्पमित्र मुजीब देशमुख यांना उत्कृष्ट प्रतीची सुरक्षा किट बक्षीस म्हणून दिली.
साप म्हंटले कि चांगल्या चांगल्याच्या काळजात धडकी भरते पण सापाला सुरक्षित पकडून त्याला मानवी वस्तीपासून दूर जंगलात सोडणे म्हणजे मोठे धाडसाचे काम आणि तेच काम करून सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आज पर्यंत अनेक सापांबरोबर इतर वन्यजीवांना देखील जीवदान देत निसर्गात मुक्त केले आहे परिणामी लोकांचे देखील जीव वाचले असून जखमी वन्यजीवांवर देखील उपचार करून त्यांचे प्राण वाचवले आहे.
पोपळघट यांच्या अश्या धाडसी कामाची दखल जेष्ठ नेते मा. खा. श्री. प्रसादजी तनपुरे साहेब यांनी घेतली आणि पोपळघट व त्यांचे सहकारी मुजीब देशमुख यांना उच्च प्रतीची सुरक्षा किट बक्षीस देऊन पुढे देखील काळजीपूर्वक काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावरून साहेबांचे वन्यजीवांप्रती असलेले प्रेम दिसून येते.
तनपुरे साहेबांनी किट दिल्यानंतर पोपळघट व देशमुख यांनी साहेबांचे आभार मानत यापुढे देखील काम करण्यास अजून ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले.
दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार खडांबे खुर्द -वांबोरि प्रतिनिधी )