प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई- -नेवासा तालुक्यातील घोडेगाव-चांदा रस्त्यावर असलेल्या शेतीतील वीज पंप (इलेक्ट्रॉनिक मोटार)
काढताना एका मजूरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घोडेगाव येथे झाली काल सकाळी घडली.
या घटनेनंतर सोनई पोलिस ठाण्याच्या समोर आज सकाळी नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या दोनशे ग्रामस्थांनी ठिय्या अंदोलन केले.यानंतर पोलिसांनी संबंधित विहिर मालकांवर गुन्हा दाखल केला.यानंतर विधी केला.
घोडेगाव-जुना चांदा रस्त्याच्या शिवारात घोडेगाव येथील अशोक नहार यांचे शेत आहे.विहिरीतील इलेक्ट्रॉनिक मोटार काढण्यासाठी शिवाजी एकनाथ सावंत (वय-२६)यास आणण्यात आले होते. तो हे काम करण्यासाठी विहिरीत उतरला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मालकाने त्याची कुठलीही खबरदारी घेतली नव्हती. असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सोनई पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.मात्र विहिर मालकावर गुन्हा दाखल केला तरच मृतदेह ताब्यात घेवू असे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.सकाळी नाथपंथी समाज संघटनेचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यासमोर
ठिय्या अंदोलन केले.अधिक तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.
शिवाजी सावंतचे आई वडील हे दोघेही अपंग असून त्याच्या दोनीही मुलांचे हृदयाचे ऑपरेशन झाले असून शिवाजी हा आपल्या परिवाराचा गाढा मोलमंजुरी करून हाकत होता पण आत्ता घरातील कमवता व्यक्ती आरोपी नहार यांच्या निष्काळजी पणामुळे मृत्यू झाला असून सावंत यांचे कुटूंब अनाथ झाल्या सारखे झाले आहे.