shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिखली ग्रामस्थ व परिवर्तन कला महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक हसिम नाज़ा यांचे सयुंक्त विद्यमाने चिखली गावामध्ये कु.राधा खुडे यांचा सन्मान..!!


 चिखली ग्रामस्थ व परिवर्तन कला महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक हसिम नाज़ा  यांचे सयुंक्त विद्यमाने चिखली गावामध्ये  कु.राधा खुडे यांचा सन्मान..!!
इंदापूर:कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा महिला विषेश पर्वाची उपविजेता महागायिका कु.राधा खुडे यांचा सन्मान सोहळा समस्त ग्रामस्त चिखली व परिवर्तन कला महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक हसिम नाज़ा  यांचे सयुंक्त विद्यमाने चिखली गावामध्ये पार पडला सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व पाच हजार रुपयांचा धनादेश देवुन राधाताई खुडे यांना सन्मानित करण्यात आले .
या प्रसंगी सरपंच वैशालीताई अर्जुन,  उपसरपंच संदिप गायकवाड, सदस्य हर्षदा पांढरे, सूप्रिया अर्जुन, मंगल शेंडगे, उत्तम खोमणे, शिवाजी नाना अर्जुन, बाळासाहेब रुपनवर, तंटामुक्तीचे अध्यक्ष रामदास अर्जुन, कव्वाल हसीम नाज़ा, सामाजिक कार्रकर्ते राजेंद्र अर्जुन, आनंदराव खुळे, रविंद्र निकम, हरि बंडगर, राहुल अर्जुन, माऊली डोंबाळे, इत्यादी मान्यवरांसह अनेक ग्रामस्थांच्या उपस्थिति मध्ये पार पडला .
यावेळी अनेक मान्यवरांनी राधा खुडे यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि लोप पावत चाललेल्या  लोकसंगीताचा वसा आणि वारसा जपत आसल्याने आनंद व्यक्त केला. त्यावेळी राधाने तिच लोकप्रिय गीत रगनांग रंगनांग हलगी वाजती, खंडोबाची कारभारीन, मेरे रश्के कमर सारखी गाणी म्हणुन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले......
close