shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाषा, साहित्य, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील बदलांची नोंद घेणे आवश्यक ः माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील**

भाषा, साहित्य, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील बदलांची नोंद घेणे आवश्यक ः माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील**

 

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कला महाविदयालय व आसाम येथील रंगापारा महाविदयालयांच्या वतीने आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन.  


३०० हुन अधिक संशोधक प्राध्यापकांचा सहभाग तर १८० अभ्यासकांचे शोध निबंध सादर.


इंदापूर : (२७ जून २१)भिगवण येथील इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविदयालय व रंगापारा शिक्षण संस्थेचे रंगापारा महाविदयालय आसाम यांचे संयुक्त विदयमाने "चेंजिंग परस्पेक्टिव्हज् ऑफ लॅंग्वेग, लिटरेचर, सायन्स अँड सोशल सायन्स " या विषय़ावरील ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सखाराम पाटील होते. तर बीजभाषक नायजेरिया येथील फेडरल विदयापीठातील प्राध्यापक बाबालोला आयोडेल सॅम्युयल, रंगापारा संस्थेच्या अध्यक्ष डॉ.चारु सहारिया नाथ,कला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, रंगापारा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. रंजन कलिटा, समन्वयक डॉ. प्रशांत चवरे, डॉ. राकेश सरकार, डॉ. संतोष माने आदि मान्यवर उपस्थित होते.

  

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये बांग्लादेशातील चितागॉंग विदयापीठातील डॉ. आलक पॉल यांनी अंडरस्टॅंडिंग अँड रिस्पोन्स ऑफ कोविड :१९ इन बांगलादेश या विषय़ावर, बेंगलोर(कर्नाटक) विदयापीठातील डॉ. अशोक हांजगी यांनी चेंजिग परस्पेक्टिव्हज् इन सायन्स याविषयावर, डॉ. हरिसिंग गौर विदयापीठ सागर(मध्यप्रदेश) येथील डॉ. आर.टी. बेद्रे यांनी चेंजिग परस्पेक्टिव्हज् इन एज्युकेश या विषय़ावर सादरीकरण केले. प्राचार्य डॉ. सखाराम पाटील, सावित्रीबाई फुले विदयापीठातील भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. जोतीराम मोरे, नोबल विदयापीठ उदयपूर येथील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. देवेंद्र पारिक व छत्रपती शिवाजी महाविदयालय, सातारा येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रोशनारा शेख यांनी सत्राध्यक्ष म्हणुन काम पाहिेले तर समारोप समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून रंगापारा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. चारु सहारिया नाथ यांनी मार्गदर्शन केले. डॉ. लक्ष्मी मुचाहरी, प्रा. बाळासाहेब राऊत,डॉ. मनिषा चवरे-जाधव व डॉ. गितार्थ कौशिक यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय करुन दिला तर प्रा.पद्माकर गाडेकर, प्रा. शाम सातर्ले, प्रा. अनिल बनसो़डे,डॉ. राकेश मौलिक चर्चासत्राचे संचलन केले. चर्चासत्रांमध्ये भारत,नायजेरिया, बांग्लादेश येथील सुमारे ३०० हुन अधिक संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला तर सुमारे १८० अभ्यासकांनी या विषयावर आपले शोध निबंध सादर केले. 

प्रास्ताविक रंगपारा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. रंजन कलिटा यांनी केले सुत्रसंचालन डॉ. प्रशांत चवरे यांनी केले तर आभार डॉ. महादेव वाळूंज यांनी मानले. चर्चासत्रासाठी कला महाविदयालय, भिगवण व रंगापारा महाविदयालय, आसाम या महाविदयालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

भाषा, साहित्य, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील बदलांची नोंद घेणे आवश्यक ः हर्षवर्धन पाटील

कोरोनामुळे भारतासह जगांमध्ये बदल होत आहेत. देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणही लागू होत आहे. या पार्श्वभुमीवर भाषा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या बदलांची नोंद घेणे ही काळाजी गरज बनली आहे. इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविदयालय भिगवण व आसाम येथील रंगापारा महाविदयालय यांनी एकत्र येऊन आयोजित केलेले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र कोरोना व इतर कारणांमुळे होत असलेल्या बदलांचा वेध घेण्यामध्ये यशस्वी होईल असा विश्वास राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

विकसनशील देशांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यास हे देशही वेगाने प्रगती करु शकतील- डॉ. बाबालोला आयोडेल सॅम्युयल. 


बीजभाषक डॉ. बाबालोला आयोडेल सॅम्युयल म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाचा अभाव ही जगातील विकसनशील देशांच्या मागासपणाचे प्रमुख कारण आहे. विकसनशील देशांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यास हे देशही वेगाने प्रगती करु शकतील. सध्या प्रगतशील देशातील संशोधक हे प्रगत देशाची वाट धरत असल्यामुळे प्रगतशील देश अधिक प्रगतशील होत आहे तर विकसनशील देशाचा विकास मात्र यामुळे मंदावत आहे. विकसनशील देशातील शासकांनी संशोधकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास हे चित्र नक्की बदलेल.

close