मीच एकटाच घाट्यात नाही..!
मी कोणाच्या वाट्यात नाही..!!
आलाच तर भेट मनापासुन..!
दोस्तीची सर नात्यात नाही..!!
घाव कर पण छाताडावर कर..!
विश्र्वास घात डोळ्यात नाही..!!
माणवतेची शेती मातीत पिकवतो..!
धर्मांद नराधमांच्या जाळ्यात नाही..!!
मंञ तंञ जादुटोन्याला बळी नका पडु..!
कुठलाच गंडादोरा माझ्या गळ्यात नाही..!!
संत महापुरुषांचा मरत नसतो एकही विचार..!
रंजल्या गांजल्यात शोध देव देवळात नाही..!!
मुक्या पाखरां साठी ठेव दाणा पाणी आंगणी..!
तुझ्यातच तुला शोध आता तु सगळ्यात नाही..!!
जे देशील तेच तुला भरभरुन मिळेल प्रेम, दुख्ख..!
बंधुभाव पिकवतो नफरत माझ्या मळ्यात नाही..!!
आकाश सुपारे
९८२२५१०२५४

