संगमनेर । प्रतिनिधी :
कोरोनासदृश परिस्थितीत कोविड पेशंट आणि नातेवाईकांना आधार देण्याचे काम शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी केले.
एखाद्या पेशंट ला हॉस्पिटलला न्यायला ऍम्बुलन्सची व्यवस्था करणे, बेड उपलब्ध नसतील तर बेड उपलब्ध व्हावे म्हणून पाठपुरावा करणे, हॉस्पिटलची बिले कमी करण्यासाठी प्रयत्न करणे. म्युकरमायकोसिस रुग्णांना औषधे उपलब्ध करण्यासाठी आरोग्यमंत्री तसेच आरोग्य राज्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा केला.पेशंटला व नातेवाईकांना आपल्या कुटुंबातील सदस्यच असल्यासारखा मदत करणारा मित्र, भाऊ किंवा मुलगा आहे अशीच प्रचिती एखाद्या गरजवंताला मदत केल्यानंतर येत असे.
संपूर्ण महाराष्ट्रभरातुन फोन आल्यानंतर तेथील प्रशासनाशी बोलून तातडीने संबंधित पेशंटला मदत कशी मिळेल यासाठी प्रयन्त करणारा युवक.
एक फोन तर गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातून आला, संबंधित नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नाही असं सांगून पेशंट ऍडमिट करण्यास नकार दिला, परंतु भाऊंना फोन झाल्यावर आरोग्य मंत्रालय, गुजरात संबंधित अधिकऱ्यांशी बोलून त्याच हॉस्पिटलमध्ये पेशंटला उपचार मिळाले.समाजसेवेचा ध्यास घेतलेला हा तरुण संगमनेर तालुक्यातील साकुर पठारभागातील बिरेवाडी गावचा रहिवासी असुन शेतकरी कुटुंबातील या तरुणाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असेच आहे.
कोविड काळात कोविड पेशंटच्या नातेवाईकांचे बेड उपलब्धता,ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रक्त, प्लाझ्मा संदर्भात फोन यायचे त्यांना मदत मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु एखाद्या पेशंटला पाठपुरावा करूनही मदत मिळत नसायची त्यावेळेस खूप वेदना व्हायच्या अशी खंत शिर्डी एक्सप्रेसचे संपादक श्री. रमेशजी जेठे यांच्याशी बोलताना शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी आपल्या भावना दिलखुलासपणे व्यक्त केल्या.

