अकोले (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका सध्या अवैध व्यावसायिकांचे माहेर घरच बनले असल्याने दृष्टीपथास येत आहे.
अवैध व्यावसायांवर जीथे पोलिसांचा वचक असावा तेथे अप्रत्येक्षपणे जर काही पोलिस व पोलिस पाटील अवैध व्यावसायीकांशी मैत्रीपूर्ण संबध प्रस्थापित करत असतील तर सर्वसामान्य त्रस्त नागरीकांच्या समस्या कशा दुर होतील हा प्रश्न सध्या अकोलकरांमध्ये मोठ्या चवीने चर्चिला जात आहे.
तालुक्यातील अवैध व्यावसायिकांची इतकी मजल पुढे सरसावली आहे की ते कोणाच्याही जागेत अनाधिकृत बांधकाम करुन आपले अवैध व्यावसाय राजरोसपणे थाटू पहात आहेत,याविषयी जर पोलिसांत तक्रार करावा तर पोलिस देखील त्यांचीच पाठराखण करत म्हणतात की कुठे गुंडांच्या नादी लागता ?,आणि का उगच पंगा घेता ? यामुळे सर्वसामान्य नागरीक हतबल झाला असून तक्रार द्यावी कुठे?आणि न्याय मागावा कोणाकडे ?अशी संभ्रमणिय अवस्था तालुक्यातील जाचकवाडी व बेलापुर येथील काही त्रस्त नागरीकांची झाली असल्याचे बघावयास मिळत आहे,त्यातीलच एक प्रकरण असे की,श्री.नवनाथ लष्करे यांच्या जागेत काही गुंड प्रवृत्तीचे लोकं बळजबरीने बांधकाम करीत आहेत.
याबाबत श्री.नवनाथ लष्करे यांनी पोलिसांत रितसर तक्रार दिली आहे,मात्र सदरील आरोपींविरुद्ध अद्यापही पुढील योग्य कारवाई होताना दिसुन येत नाही,यावर योग्य न्याय मिळावा यासाठी श्री.नवनाथ लष्करे जिल्हा पोलिस प्रमुखांना लक्ष घालणेकामी निवेदन देणार असल्याचे समजते.

