वाढीव बिलांसंदर्भात कोरोना बिल लेखापरीक्षण समितीच्या अध्यक्षा उपजिल्हाधिकारी मा.पल्लवी निर्मल यांच्याशी चर्चा.
अहमदनगर । प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमध्ये अचानक वाढणारी रुग्णसंख्या ,ऑक्सीजन , इंजेक्शन्स चा तुटवडा जनतेच्या मनातील भिती यांचा गैरफायदा घेत राज्यातील खाजगी रुग्णालये तसेच कोव्हिड सेंटर्सनी रुग्णांकडून अवाजवी डिपॉझिट रक्कम घेतली. तसेच बिलांची शासकीय ऑडिटरकडून पुर्वतपासनी करुन मगच बिल रुग्णांना देण्याचे आदेश असताना देखील ऑडिटरच्या सहीशिक्यांविरहीत बिलं रुग्ण व नातेवाईकांना देऊन कोरोना उपचासाठीचे शासनाने ठरवून दिलेले उपचार शुल्क आकारणीचे आदेश झुगारून अवाजवी उपचार शुल्क आकारत रुग्ण व नातेवाईकांची अमानुष लूट केल्याच्या अनेक घटना राज्यभर घडल्या.
महात्मा फुले जिवनदायी योजनेच्या बहुतेक अंगीकृत रुग्णालयांनी देखील परिस्थितीचा गैरफायदा घेत योजनेअंतर्गत उपचार नाकारत सर्वसामान्य रुग्णांची लूट केली. अश्या आर्थिक फसवणूक झालेल्या रुग्ण व नातेवाईकांना रुग्णालयांनी आकारलेल्या जास्तीच्या रक्कमेचा परतावा जनआरोग्य फाऊंडेशन शासनदरबारी पाठपुरावा करुन मिळवून देईल असे फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष मा.योगिराज धामणे म्हणाले.
कोरोना बिलांबाबत शासकीय नियमानुसार किती शुल्क आकारायला हवे तसेच एका दिवसाच्या उपचारशुल्क रक्कमेत काय समाविष्ट आहे , पिपिई किट शुल्क किती आकारले जावे यासंदर्भात कोणतीही शंका असल्यास ७३५०६३३६७५ , ९३७०७९०७१२ या व्हाट्सॲप नंबरवरती आपण रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांचे फोटोज पाठवावेत किंवा संपर्क करावा असे आवाहन संघटनेचे प्रदेशसंघटक मा. योगेश पिंपळे यांनी केले.

