shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्य अभियंताचा वाढदिवस, योगेश कापडणीस यांनी शैक्षणिक साहित्य वाटप करुन केला साजरा.. !


नाशिक । प्रतिनिधी :
मागील वर्षी एकलहरे वीज केंद्रातील मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने येथील परिसरातील कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले होते.


या वर्षीच्या वाढदिवसाला ते परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा हा माणुसकीचा वसा एकलहरे वीज केंद्रातील कर्मचारी व सामजिक कार्यकर्ते योगेश कापडणीस हे जपत आहेत.


याही वर्षी मोहन आव्हाड यांच्या वाढदिवसानिमीत्त येथील कर्मचारी योगेश कापडणीस यांनी  कोरोना काळात एकलहरे वीज केंद्रातील ज्या कंत्राटी कामगारांचे रोजगार गेले,जास्तीचा वैद्यकीय खर्च झाला, ज्या पाल्यांचे छत्र हरवले अशा गोरगरिब २५ विद्यार्थ्यांना एक डझन वहया, कंपॉस व पेन्सिल बॉक्स असे शैक्षणिक साहित्य त्यांच्या घरी जाऊन वाटप केले.व काही पाल्यांना त्यांनी घरी बोलावले व त्यांच्याशी शैक्षणिक बाबींविषयी हितगुज करुन शैक्षणिक साहित्य वाटून त्यांचा आनंद द्विगुण केला.

                     
त्यांच्या या विशेष कार्याचे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी कौतुक व अभिनंदन केले.
close