shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर अनलॉक झाले असले तरी..ऑफलाईनवरून ऑनलाईनवर येण्याची वेळ येवु नये म्हणून घ्या काळजी..!!



प्रतिनिधी । आसावरी वायकर :

अ. नगर : (दि .७) :
आजपासून आपलं अहमदनगर अनलाॅक  होतंय. रात्रीच्या पावसाने सगळं काही धूवून अगदी  स्वच्छ आणि फ्रेश मूडमध्ये आज पासून आम्ही नव्या जोमाने नव्या उमेदीने उत्साहाने कामाला लागत आहोत.

पावणेदोन महिने अगदी घरात बसून कंटाळा आला होता. अनलॉक शब्द जसा ऐकलाय ना तेव्हापासून खूप प्लॅन्स केलेत. कुठे जायचं, काय काय खायचं, कुणाकुणाला भेटायचं हो ना !
    
पण मंडळींनो थांबा जरा घाई करु नका संसर्ग जरी नसला तरी काळजी आणि जबाबदारी अजून तरी संपलेली नाही. बघा आपल्याला पटतंय का? 
 ' बाबूजी धीरे चलना
महामारी में थोडा संभलना 
बडे धोखे है, इस राह में...
हो खरंय ,अजून धोका कमी झालेला नाही पहिली लाट खूप होती पण मृत्युदर त्या तुलनेत कमी होता दुसरी लाट त्या तुलनेत कमी होती पण काहीशा लापरवाहीने मात्र मृत्युदर जास्त होता. त्यातच अगदी जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आणि चांगल्या लोकांना गमवावे लागलेय. 
 याला कारण बेफिकिरी. 

बऱ्याच लसीकरण केंद्रावर काही उत्साही तरुण आम्हाला काही होणार नाही आम्ही आमक्या ची माणसं असं सांगून अजिबात मास्क न लावता इकडे तिकडे फिरत होती. आमक्याची माणसं  तमक्याची माणसं असं सांगून कोरोना  होत नाही का ? 
 
 अरे दादा तुझ्यामुळे तू कुटुंबातील जवळच्या लोकांना याच बेफिकिरी मुळे गमावले आहेस हे विसरतो आहेस अरे तुझ्यात असेल प्रतिकारशक्ती पण तुझ्या कुटुंब मित्रपरिवार आजूबाजूचे लोक यांना प्रतिकार शक्ती असेल याची शाश्वती आहे का रे तुला?

 मंडळींनो सगळ्यांना खूप असह्य होतय घरात बसून पण जर आपल्याला आपले भविष्य चांगले आणि निरोगी बघायचे असेल तर काय हरकत आहे थोडं थांबू यात ना !
 
कालचा ग्रुपमध्ये बसणारा आरोग्य विषयी सूचना पाळणारा आपल्यातून अचानक निघून जातो आणि आठवण बनुन भिंतीवरल्या फोटोत जाऊन बसतो खरंच खूप हळव होऊन जातो मन पण नाईलाज असतो.

मंडळींनो हा संसर्ग नैसर्गिक आहे का कोणी जैविक ॲटॅक म्हणून देशात सोडलाय याचा थोडा अभ्यास करूयात परत विषय तिथेच येतो आहे आपल्यातील असंघटीत पणा .

 सगळ्यांनी एकजुटीची मशाल हाती घेऊयात आणि आपल्या कुटुंबाला समाजाला गावाला राज्याला आणि देशाला अखंडित ठेवूयात जमेल ना सर्वांना सांगितलेलं पाळायला? नाहीतर काय होणार?
नगमें हैं शिकवे हैं किस्से हैं बातें हैं 
बातें भूल जाती हैं यादें याद आती हैं...

 आपल्याला आठवण म्हणून जगायला आवडेल की प्रत्यक्ष जगायला आवडेल? 
थोडा विचार गांभीर्याने करूयात काळजी घे नियम पाळूयात. उद्याची स्वच्छ सकाळ परत बघायची आहे ना!
 (अनुरिता झगडे यांचे लेखनीतुन ... ]
close