प्रतिनिधी । संजय वायकर :
खांडगाव : (दि .७ ) :खांडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन स्व. बारकूशेठ जाधव यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं.
तळमळीचा,सरळमार्गी,प्रामाणिक व्यक्तिमत्त्व असलेले आणि स्व.राजीव राजळेंचा जिवाभावाचा कार्यकर्ता,राजळे कुटूंबाच्या घरातील सदस्या प्रमाणे राहिलेले व्यक्तिमत्व, स्वर्गीय राजीव भाऊ राजळे यांच्या बरोबर सन 1998 पासून राजकारणात सहभागी झाले तेव्हा पासून तर आज पर्यंत स्व. बारकुशेठ जाधव व मोठे बंधू श्री कुशाभाऊ जाधव राजळे कुटुंबाच्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी साथ देणारे बंधू,
खरोखरच आज विश्वास बसत नाही की स्व.बारकू शेठ आपल्यात नाहीत. परंतु त्यांनी केलेल्या प्रत्येक कामात त्यांची आठवण सदैव राहील. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
स्व. बारकुशेठ जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

