shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एसटी कामगारांना वाटले चणे फुटाणे...!.एसटी चा होत आहे खाजगीकरणाचा डाव ?- शिवराम पाटील..



प्रतिनिधी । संजय वायकर :

जळगाव : (दि .७) :माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वैयक्तिक नफेखोरी साठी एसटी डेपोत शिवशाही बस घुसडली.कामगार संघटनांनी विरोध करू नये म्हणून संघटनेच्याच नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करवून घेतले.त्यामुळे कामगार चूप बसले.शिवशाही हायवेवर धावू लागली.पैसे कमवू लागली.खाजगी चालक गाड्या पळवू लागले.अपघात होऊ लागले.
 तरीही एकाही एसटी संघटनेने विरोध दर्शवला नाही. का? आमचेच नेते फुटीर निघाले. घरभेदी निघाले. म्हणून रावते यशस्वी झाले. पुढे काय? एसटी चा दिवसेंदिवस सत्यानाश सुरू झाला.अनेक गाड्या जाणिवपूर्वक कंडेम केल्या. चालक रिकामे बसले.चुल्हा बंद पडला.चणे फुटाण्याला मौताद झाले. आणि इकडे कामगार नेते चखणा मखणा चाटत होती.ही अवस्था एसटी कामगार हतबल होऊन पाहात राहिले. म्हणून आज ही दयनीय अवस्था आलेली आहे असे जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे श्री .शिवराम पाटील यांनी सांगितले .
      
 वर्षभरापासून कोरोनाचे भय दाखवून ,वाघ आला रे आला" बोंबलून एसटी गाड्या डेपोत धुळखात पडल्या.चालक,वाहक,मेकैनिक रिकामे बसले.बायका पोरं भाजीपाला विकू लागले.पण आधिकारी व संघटना नेत्यांचे लठ्ठ पगार व गोलमाल मानधन चालूच राहिले. हे विदारक चित्र कोणीही उजेडात मांडले नाही. 

या संधीचा फायदा घेत आताचे परिवहनमंत्री मा.आनिल परब ज्यांना मंत्र्यांनी खाजगीकरणाचा डाव मांडला.५००खाजगी गाड्या एसटी डेपोत घुसडून नफा कमावण्याचा बेत आखला. आहेत त्याच एसटी गाड्या बेजार आणि बेकार पडलेल्या असताना नवीन का? म्हणजे बायकोच्या आजारपणात सालीचे बाळंतपण ,असा हा विचित्र प्रकार आहे.
         
आता एसटीच्या  खाजगीकरणाचा घाट घातला.एसटी कामगारांच्या २२ संघटनांपैकी नाममात्र संघटना नेत्यांनी विरोधाची भुमिका घेतली.काहींनी,शिजले आहे तर जेवून घ्या, अशी भुमिका घेतली. या मानसिकतेचा फायदा परिवहनमंत्री ने घेतला.१ जून ला एसटीच्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून मुंबईत समारोह साजरा केला.त्यात मेल्यावर ५ लाख,वारसांना नोकरी,१५०चा बीडीकाडी भत्ता जाहीर केला.हे चणेफुटाणे पाहून किंवा खाऊन एसटी कर्मचारी खुष होतील,असा  प्रयत्न आहे.कर्मचाऱ्यांना अल्पवयीन किंवा बाळबोध समजून आपल्या खाजगी गाड्या डेपोत घुसडण्याचे कटकारस्थान चटकन लक्षात येते.अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्यासारखा हा प्रकार आहे.    
       
असे चणे फुटाणे दाखवून परिवहनमंत्री एसटी महामंडळाच्या शहरातील मोक्याच्या जागा आधी वापरून नंतर बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा धुर्त डाव कर्मचारी बांधवांनी हाणून पाडला पाहिजे. त्या समारोहात मंत्री व कामगार नेत्यांची चुंबाचुंबी झाली.जेथे झोंबाझोंबी अपेक्षित होती.कि एसटी चे खाजगीकरण होऊ देणार नाही. सतेज पाटलांनी लहानपणाची आठवण सांगितली.मग,का निघाले एसटी संपवायला?आधीच अनिल परब इडीच्या झंझटमारीत अडकले आहेत.आता पुन्हा हा खाजगीकरणाचा उपद्व्याप करून नक्कीच मंत्रीपद गमावून बसतील. इतका हावरटपणा  ठाकरे सरकारला गोत्यात आणणारा आहे.
      
एसटीचे जे काही संघटना नेते तेथे  चहामधे बिस्कीट बुडाल्यासारखे बुडवून नरम केले गेले,त्यांचीही आताची मानसिकता ओळखली पाहिजे.ते विरघळले म्हणजे त्यांचे अस्तित्व संपले.त्यांनीच संपवून घेतले.कामगारांनी ही दृष्ये पाहिलीत.ऐकलीत.ती बरी नव्हेत.
    
 दोनचार संघटना चहाच्या कपात विरघळल्या तरी उर्वरित संघटनांनी आपला विरोध कायम ठेवला तर राजकीय पक्ष विधानसभेत बाजू मांडतील.आम्ही त्या दिशेने प्रयत्न केला.करीत आहोत.मा.नाना पटोले साहेब यांच्या पत्रव्यवहाराची ,पत्रोत्तराची  वाट पाहात आहोत.तोपर्यंत कोरोनाचा वाघ जंगलात पळून जाईल.शिवसेनेचा वाघ घराबाहेर पडेल.तेंव्हा वाघाचे अंगावरील चट्टेपट्टे दिसू लागतील.मनातील काळे कुट्टे ओळखता येतील.त्या वाघाची पाऊले ओळखून विरोधाची धार टोकदार करता येईल.
अशी माहिती श्री . शिवराम पाटील यांनी दिली .
close