इचलकरंजी । प्रतिनिधी :
राज्यातील गौणखणिज उत्खनन संदर्भात वाढीव राँयल्टी व दंडात्मक कारवाई संदर्भातील विषयात मार्ग काढण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई मधील राँयलस्टोन या निवासस्थानी बैठक घेण्यात आली, तसेच कासारवाडी येथील जमीन वनखाते मध्ये समाविष्ट होऊ नये यासाठी निवेदन देवुन चर्चा करण्यात आली..!
या दोन्ही विषयावर शासकीय अधिकारी व संबंधीतांची लवकरच बैठक घेवुन योग्य मार्ग काढु अशी ग्वाही यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
या वेळी महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे अध्यक्ष मुकुंद पोवार, सतिष मुरकुटे (बिड), शिवाजी पोवार(टोप), रमेश पोवार(कोल्हापूर), रंगराव भोसले,अविनाश कलगुटगी, संभाजी पोवार, करीम सनदी आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

