कुष्ठावर मोठे औषध आहे. करंजाची साल व त्याचे बियांचे तेल हे उपयोगात आणतात. कोणत्याही प्रकारची खरूज, गजकर्ण वगैरेवर करंजाचे तेलाचा फार उपयोग होतो. करंजाचे तेल चोळून चोळून अंगास लावावे; कंडू खरूज, बरी होते.
करंजाच्या बिया वृषण (अंड) वृद्धीवर वाटून लावतात. वृद्धी कमी होते. गंडमाला, शरीरात उठलेल्या कोणत्याही प्रकारच्या गाठी वगैरेवर तसेच सुजेवरही करंजाच्या बिया वाटून लेप करतात, बरी होते. भगंदर (शौचाचे द्वाराशी पडलेला व्रण) यावर करंजाची पाने बांधतात; व्रण बरा होतो.
या झाडाचे पाळ उगाळून पोटात दिले असता आराम वाटतो. करंजाची पाने पाण्यात उकळून त्याने स्नान केले असता संधिवाताच्या रोग्यांना बराच फायदा होतो.
करंजाचे तेल, लिंबाचा रस, कापूर, गंधक यांचे समभाग मिश्रण करून ते हट्टी खरूज, इसब यास लावले असता त्वरित गुण येतो.

