झगडेवाडी ग्रामस्थ व माळी सेवा संघ यांच्या वतीने
अतुलशेट झगडे,अक्षय माळी यांचा नागरी सत्कार
इंदापूर प्रतिनिधी: महावितरण कंपनीचा कारभार प्रभावीपणे चालवण्यासाठी तसेच सर्व सामान्य जेनतेला दर्जेदार सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय विद्युत वितरण निमंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंदापूर तालुका विद्युत वितरण निमंत्रण समितीच्या तालुका अध्यक्षपदी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा श्री अतुलशेट झगडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी सरडेवाडी येथील युवा उद्योजक चि अक्षय भैय्या माळी यांची निवड
झाल्याबद्दल झगडेवाडी ग्रामस्थ व इंदापूर तालुका माळी सेवा संघ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला ,या बरोबरच कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थिती मध्ये स्वताःच्या जिवाची कसलीही पर्वा न करता सर्व सामान्य जेनतेला मदत केलेल्या बाळासाहेब झगडे,आशा सेविका सौ. राणी झगडे,ग्रामसेवक आबा जगताप,निरज झगडे,महेश झगडे यांना माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व इंदापूर तालुका विद्युत नियंत्रण समिती चे अध्यक्ष मा श्री अतुलशेट झगडे,माळी सेवा संघ इंदापूर तालुका अध्यक्ष बापुसाहेब बोराटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष चि. अक्षय भैय्या माळी,माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे कायदेशीर सल्लागार ॲड. नितिन राजगुरु,झगडेवाडी चे माजी उपसरपंच व महात्मा फुले ग्रुप चे अध्यक्ष बाळासाहेब झगडे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण झगडे,डाॅ. दादाराम झगडे,माजी सरपंच सुरेश झगडे,प्रगतशील बागायतदार विजय झगडे,माळी सेवा संघ इंदापूर तालुका संघटक दादा शिंदे,तालुका सचिव संदिप बारवकर, संतोष झगडे,सोमनाथ झगडे, ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

