प्रवाशांत आनंदाचे वातावरण ...!
प्रतिनिधी । संतोष वायकर :
करमाळा: (दि .२) :राज्य परिवहन महामंडळ करमाळा आगाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच फेऱ्या बंद केल्या होत्या. दि. १ जुन पासून बऱ्याच फेऱ्या पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. त्यामध्ये टेंभूर्णी, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपुर , सोलापूर या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. प्रवाशी प्रतिसाद पाहून या मार्गावर बस सोडण्यात येतील.
तरी आपली लालपरी पुन्हा एकदा नव्याने या बसेस सुरु करण्यात येत आहे. प्रवाशांनी प्रवास करताना मास्क लावूनच प्रवास करावा. तसेच प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाईज करून पुढील फेरीसाठी वापरण्यात येईल. महामंडळाकडून प्रवाशांची काळजी घेऊनच बससेवा सुरु करण्यात येत असून प्रवाशांनी मास्क व संनिटायझर वापरून सहाकार्य करावे व या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख अश्विनी किरगत, सहायक कार्यशाळा अधीक्षक श्री. आनंद रोमन, सहायक वाहतुक अधीक्षक कदम यांनी आवाहन केले आहे...!

