shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

करमाळा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आदर्श शिक्षक झाले सेवानिवृत्त ...


प्रतिनिधी । संतोष वायकर :
साडे : (दि .२) :हायस्कुल साडे,ता. करमाळा, जिल्हा.सोलापूर येथे शिक्षक म्हणून 24 वर्षे तर पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून 9 वर्षे सेवा करून 31 मे 2021रोजी निवृत्ती दत्तात्रय सुरवसे हे सेवानिवृत्त झालेले आहेत. 

साडे विद्यालयात त्यांनी विविध उपक्रम राबविले. शाळेला कम्पोऊंड करून  वृक्षारोपण करण्यात आले,विध्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेकविध उपक्रम--निबंध स्पर्धा,लेखन स्पर्धा,वत्कृत्व स्पर्धा,कमी क्षमता विध्यार्थी विकास,चित्रकला स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,खेळाच्या स्पर्धा, इंग्रजी,गणित, विज्ञान या विषयाचे जादा ताशिकेला मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांचा खूप ओढा शाळेकडे झाला. दूरच्या खेड्यातून ये-जा करणाऱ्या बालकांसाठी प्रवासाची अल्पदरात सोय करण्यात आली.गरीब व गरजू बालकांसाठी ,गणवेश, वह्या,शैक्षणिक साहित्य मोफत पुरविण्यात आले. हा सर्व खर्च शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारातून 1 टक्का कपातीतून करण्यात आला. 

समाजकल्याण विभागामार्फत चालू असलेल्या वसतीगृहात गरीब शेतकरी व शेतमजूर यांच्या मुलांना प्रवेश देऊन अल्प निधीत वर्षभर सांभाळ केला. सकाळ वर्तमानपत्राच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा राबविण्यात आल्या. 10 वीची बोर्डाची परीक्षा कॉपीविना केंद्र चालविले.                                     

मुख्याध्यापक पद घेतल्यानन्तर माध्यमिक विभागाला जोडून 11 वी 12 वी विज्ञान व कला विभाग सुरू केले.ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाची यामुळे सोय झाली.        मध्यान्ह भोजन केवळ 8 वी पर्यंतच्या बालकांसाठी असताना 10 वी पर्यंतच्या बालकांना  दरदिवशी त्याचे वितरण केले जात असायचे.        

मुख्याध्यापक पद ग्रहण करताना" मी 1 रुपया भ्रष्टाचार करणार नाही व कुणालाही करू देणार नाही",अशी शपथ घेतली होती आणि 9 वर्षाच्या काळात ती तंतोतंत पाळली. पालक आणि ग्रामस्थांची कामे विनाविलंब वेळोवेळी पूर्ण करण्याचा कटाक्ष पाळला.साडे गाव आणि परिसरातील सामाजिक कामामध्ये शाळा,शिक्षक,आणि कर्मचारी यांचा सातत्याने सहभाग नोंदवला.                                 

1988 पासून साडे आणि परिसरातील सामाजिक समस्या संचार, पुढारी, सकाळ या वृत्तपत्राच्या माध्यमातून सोडविल्या. शिक्षक आणि पत्रकार अशी दुहेरी भूमिका अखंड बजावली. कोणतेही काम चांगले,अधिक चांगले,सर्वात चांगले कसे होईल याकडे लक्ष दिले.               भोसे,ता.करमाळा या जन्म गावी एक दूध संस्था,एक पतसंस्था स्थापन करून गरीब शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती केली. 

ग्रामस्थांनी 15 वर्षे उपसरपंच पद दिले.राहत्या वस्तीवर 15 लाख किमतीचे एक दत्तमंदिर बांधले असून दरवर्षी 7 दिवसांच्या सप्ताहाVचे आयोजन केले जाते. शिक्षक,मुख्याध्यापक,पत्रकार,आणि संप्रदायातील व्यक्ती या सर्वांच्या संगतीत राहून वयाची 58 वर्षे कशी झाली हे कळले नाही.                                       

करमाळा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष,आदर्श शिक्षक, कृतिशील मुख्याध्यापक,गुणवन्त असे पुरस्कार मिळाले. दरवर्षी आषाढी पायी वारी न चुकता करण्याचा पायंडा आहे.
close