मोर्शी - उपजिल्हा रुग्णालय मोर्शी द्वारे दिव्यांगांना कोविड - 19 लसीकरण विशेष सत्र दि.05/06/2021 रोजी आयोजित करण्यात आले होते यात दिव्यांगांना विशेष काळजी घेऊन लस देण्यात आली या विशेष लसीकरणास मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवेंद्रजी भुयार यांनी सदिच्छा भेट दिली व मार्गदर्शन केले.
नगराध्यक्षा सौ. मेघनाताई मोहन मडघे,मोहन भाऊ मडघे, नगरसेविका क्रांतीताई चौधरी, रोहित नागले,शाम मोरे,राजेंद्र देशमुख आकाश छापाने यांनीही यावेळी भेट दिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, व कोविड 19 जनजागृती करण्यात येत आहे यावेळी रुग्णालयाचे आरोग्य सहायक विनायक नेवारे, विनय शेलुरे आरोग्य कर्मचारी प्रशांत बेहरे,विजय गाडवे,योगेश पोहोकार,निलेश शिंदे आरोग्य सेविका प्रिती ठाकरे,पुष्पा पंधरे, जयश्री बेलसरे,कल्पना पंधरे,भारती राऊत उपस्थित होत्या....

