येवला:(प्रतिनिधी-संतोष राऊळ)
नाशिक जिल्ह्यातील तालुका येवला येथे शहरातील ग्रामदैवत असलेले श्रीकाळभैरवनाथ मंदिरात राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले आणि सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख मान्यवरांनी व समाजातील काही युवकांनी शिवाजी महाराजांबद्दलचे आपले विचार मांडले व आजच्या सर्व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे हे पटवून दिले. तसेच राऊळ समाजातील युवकांनी येवले शहरातील आझाद मैदान येथील महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.
सदर कार्यक्रमासाठी शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य श्री. पहिलवान एम. एस. हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.त्याचबरोबर राऊळ समाजातील जेष्ठ श्री. बाळनाथ राऊळ व कैलास राऊळ आणि समाजातील सर्व युवक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवकांनी परिश्रम घेतले.

