शिर्डी । प्रतिनिधी : ( संजय महाजन ) :
शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी नगरपंचायतच्या गरजू स्वच्छता कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये शिर्डी शहर काँग्रेस ,युवक काँग्रेस तसेच एन.एस.यु.आय.च्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमृत गायके, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रसाद शेळके,तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे,एन.एस.यू.आय.चे तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन,शहर काँग्रेसचे संघटक सुवरनेश् साबळे,युवकचे शहर उपाध्यक्ष संतोष वाघमारे,युवक सचिव कृष्णा गायकवाड,शहर उपाध्यक्ष मोसिन सय्यद,समीर शेख,शिवा भोंडगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

