एम .एस .ई .बी . ने लवकरात लवकर दखल घ्यावी ... मनिष बोर्डे ...
प्रतिनिधी :संजय वायकर
अ .नगर ( दि .१२ ) : नगर शहरातील माणिक चौक जवळील बडोदा बँक समोर विजेच्या तारांचा खांब असून त्यावरील तारा जवळच असलेल्या झाडांमधून गेल्या असल्यामुळे तारा चिकटून स्पार्किंग होत आहेत .
शेजारीच कोतवाली पोलिस स्टेशनचा रहिवासी भाग असून तेथील भिंतीजवळच या तारा झाडांमुळे एकमेकांना चिकटतात . परिणामी विद्युत पुरवठा खंडीत होवुन तारा तुटुन त्या खाली असलेल्या पार्किंग मध्ये जिवीत हानी सुध्दा होवू शकते अशी माहिती येथील समाजसेवक आणि अहमदनगर ड्रग्ज हाऊस या एजन्सीचे श्री . मनिष बोर्डे यांनी दिली .
संबंधीत विभागाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी अशी येथील नागरिकांमधून मागणी होत आहे .


