प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई : सोनई वांबोरी रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून सध्या 20 ते 25 ट्रॅक्टर व आठ ते दहा डंपर च्या साह्याने मुरूम वाहतूक सुरू असून महसूल खात्याकडून यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की महसूल च्या आशीर्वादाने मोरया चिंचोरा येथून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची वाहतूक होत असून भरधाव वेगाने डबल 20 ते 25 ट्रॅक्टर व आठ ते दहा धमपर असून या भागात टोळ्या तयार झाल्या असून महसूल खाते अस्तित्वात आहे की नाही अशी शंका उपस्थित होत आहे मोबाईल द्वारे लोकेशन घेऊन बेसुमार गौण खनिजाची चोरीही होत आहे.
शासनाची फसवणूक करून हा प्रकार राजरोस चालू असून सोनई वांबुरी रस्त्याने प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे डबल टेलर मुळे चालकाला पाठीमागील काहीच दिसत नाही त्यामुळे ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होण्याची जास्त शक्यता आहे शाळा सुरू झाल्यावर या रस्त्यावरून हजारो विद्यार्थी विद्यार्थिनी ये-जा करतात त्यामुळे महसूल विभागाने या वर कारवाई करणे गरजेचे आहे तसेच सोनई वांबुरी रस्ता दुरुस्तीची मागणी ही परिस्थिती परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

