shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डिझेल चोरांना आश्रय देणाऱ्या भगवान अंबादास इलग याला अटक..!!


प्रतिनिधी । मोहन शेगर 
सोनई: सोनई ग्रामसुरक्षा दल व सोनई पोलीस यांनी गेल्या आठवड्यात पाठलाग करून मध्यप्रदेशातील डिझेल चोर आरोपींना मोरया चिंचोरा शिवारात पकडले होते. संबंधित आरोपी मध्यप्रदेशातील सुजलपूर येथील असून त्यांना आश्रय देणारे मोरेचींचोरे येथील भगवान अंबादास इलग याला सोनई पोलिसांनी तपासाअंती अटक करून सहआरोपी केले आहे. 


भगवान अंबादास इलाग याला तीन दिवसांची पोलिस कस्टडी दिली होती.यानंतर आता तो नेवासे येथे न्यायालयीन कोठडीत आहे.भगवान अंबादास इलग याच्यावर भादवि कलम 399, 402, 389, 411,212 या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

तसेच मध्यप्रदेशातील पकडलेले सहा डिझेल चोर पहिले नगर-औरंगाबाद महामार्गावर डिझेल चोरीचे काम करत होते. त्यांच्यावर मालेगाव, शिर्डी, अहमदनगर एमआयडीसी पोलीस स्टेशनला डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदर डिझेल चोरीचा तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांनी केला.
close