shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील कंत्राटी सुरक्षा कर्मचारी यांनी दिले - मंत्री प्राजक्त तनपुरे यांना निवेदन”..!!

राहुरी: महाराष्ट्र राज्यात कृषि क्षेत्राच्या बाबतीत अग्रेसर असलेले कृषि विद्यापीठ येथे दोन दिवसांपूर्वी तेथील धर्माडी गेस्ट हाउस येथे माननीय मंत्री प्राजक्त तनपुरे शासकिय कामकाजा करिता आले असता महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील कंत्राटी सुरक्षा कर्मचारी यांनी त्यांना आपल्या विविध प्रकारच्या प्रलंबित असलेल्या मागण्याचे निवेदन दिले.
  
  

महात्मा फुले कृषि विद्यापीठ कंत्राटी सुरक्षा कर्मचारी हे मागील अनेंक वर्षापासून वेगवेगळ्या खाजगी ठेकेदारा मार्फत सुरक्षा कर्मचारी म्हणून काम पाहत आहे, जाणून घेऊयात त्यांच्या मागण्या. 
    
➡️काय आहेत निवेदनातील प्रमुख मागण्या..!!
         
आज पर्यंत या सर्वच ठेकेदारांकडून आमचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर या पूर्वी देखील झालेले आहे आणि आज देखील काही वेगळी परिस्थिती नाही,आम्हाला यापूर्वीची कोणत्याच दिवाळीला बोनस मिळाला नाही., तसेच रजेचा पगार मिळावा हि अतिशय रास्त मागणी आहे पण ती कधीही पूर्ण झाली नाही. आम्हाला कोणताही सण असो की उत्सव सुट्टी मिळत नाही; मिळालीच तर त्याचा पगार मिळत नाही ग्रँजूटी, मेडिकल सुविधा, अथवा आम्ही जर इतर कर्मचार्याच्या बदली जर  काम काम केले तरी देखील आम्हाला जादा कामाचे वेतन कधीच मिळत नाही. ह्या आणि इतरहि अनेंक मागण्या खूप दिवसापासून प्रलंबित आहे.
   
    
म्हणून आमची या निवेदनाद्वारे मागणी आहे की  आम्हाला महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी हि आस्थापना “अहमदनगर सुरक्षा मंडळात” नोंदणी करावी सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणी करून आम्हाला शासनाच्या नियमानुसार मिळणारे वेतन आणि इतरही लाभ मिळावेत, तसेच आमची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सुरक्षा रक्षक पदांवर नियुक्ती व्हावी.
     
 
_वरील सर्व मागण्यांचे निवेदन नगरविकास,आदिवासी विकास, उर्जा,उच्च आणि तंत्र शिक्षण,आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिल्यानंतर मंत्री तनपुरे यांनी लगेचच सांगितले की हा सर्व विषय महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री दादासाहेब भुसे यांच्या पर्यंत मांडतो आणि यांच्याशि सकारात्मक चर्चा करून योग्य तो न्याय मिळवून देण्यास मी प्रयत्न करील असे आश्वासन दिले._ 
      
तसेच यावेळी निवेदन देतांना डी.एन.जाधव,म्हसू हाळनोर, मयूर आणासाहेब हरिश्चंद्रे,जयेश पवार, धसाळ आदी.महात्मा फुले कृषि विद्यापीठ कंत्राटी सुरक्षा कर्मचारी व सुपरवासर उपस्थित होते.
  
दिपक हरिश्चंद्रे (पत्रकार-खडांबे खु.) प्रतिनिधी-वांबोरी.
close