shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तपोवन रोडवर आईसह तरुणाला मारहाण..!!

तपोवन रोडवर आईसह तरुणाला मारहाण..!!

प्रतिनिधी :संजय वायकर

अ .नगर :(दि .१६) : नगर येथील सावेडी उपनगरातील तपोवनरोड येथे निखिल पावडे (वय २७ ) या तरुणास व त्याच्या आईस  तरुणाकडून मारहाण करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,
दि .१० जुन रोजी निखिल पावडे हा सर्जीकल मास्क घेण्यासाठी आंनद ऋषी हॉस्पिटल येथे मोटार सायकलने जात असताना अश्विनी बेग ही मला चांदणी चौक येथे आवाज देवून " निखिल भाऊ कुठे चालले आहे "असे विचारले असता " सर्जिकल मास्क घेण्यासाठी चाललो आहे " असे बोलून पुढे निघून गेला . हॉस्पिटलमधून सर्जिकल मास्क घेवून  सायंकाळी ०६/३० च्या सुमारास  घरी आलो असता अश्विनी बगे हीचा आत्ये भाऊ विजय (पूर्ण नाव माहित नाही )याने  मोबईल वरती फोन करून अश्विनीचे घरी बोलावून घेतले .तेथे गेल्यावर विजय ने, "अश्विनीशीे काय झाले तुझे" असे विचारले असता चांदणी चौक येथे वरील झालेले  बोलणे त्याला सांगितले . त्यानंतर विजय  म्हणाला की, " अश्विनी व तुझे सोबत बोलतानाचे फोटो भावेश बगे याला गौरव कदम व संदिप गर्जे यांनी दाखवले "त्यावर निखिल म्हणाला की , " अश्विनी ही माझ्या बहिणी प्रमाणे आहे तुम्ही गैरसमज करून घेवू नका.


दि .११ जुन रोजी दुपारी ०७/३० चे सुमारास निखिल आणि अनिल त्यांचे घराजवळील मोकळ्या मैदानावर कॉलनी मधील मित्र अक्षय माळोदे , अंकुश रोकडे, तुषार साळवे ,गणेश निकम ,अनिल क्षिरसागर तसेच संदिप गर्जे असे क्रिकट खेळून घरी जाण्यास निघालो असता संदिप  याने विचारले की, " तु काल अश्विनी बगे हिचे घरी जावून काय सांगितले .त्यांचे घरी असे तुमचे दोघांबाबत बोललो नाही तुला वाटत असेल तर आपण त्यांचे घरी जावू असे बोललो असता संदिप ने तेथे खाली पडलेला दगड हाताने उचलून डोक्यात मारला डोक्यातून रक्त जास्त येवू लागले त्यानंतर त्याने निखिल ला लाथा बुक्काने मारहाण केली . 

तो आरडा ओरडा करू लागल्याने त्याची आई भांडणे सोडवण्यासाठी आली असता संदिप गर्जे याचे वडिल (पूर्ण नाव माहित नाही ) तेथे आले व त्यानी निखिलच्या आईला बाजूला करून आईचे डोक्यात दगड मारला . निखिल याने तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये मारहाणीची तक्रार नोंदवली आहे .
close