shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोन्याच्या दागिन्यांवर Gold Hallmark सक्तीचा, जाणून घ्या हॉलमार्क म्हणजे काय ?



------------------------------------
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७
------------------------------------

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केल्याने आजपासुन 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होणार आहे. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. मात्र ग्राहक त्यांच्याकडे असलेले सोने विक्री हॉलमार्कशिवाय करु शकतात.

काय असतो हॉलमार्क ?

हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे मानक मानले जाते. या अंतर्गत प्रत्येक दागिन्यावर किंवा कलाकृती भारतीय मानक ब्युरो अर्थात BIS आपल्या मार्कद्वारे शुद्धतेची ग्वाही देते.

सोन्याच्या दागिन्यांमध्ये किती टक्के सोने आणि किती टक्के इतर धातूचा वापर केला गेला आहे हे हॉलमार्कला दिलेल्या क्रमांकावरून लक्षात येते.

यावरून हॉलमार्किंग म्हणजेच सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर दिलेली खात्री आहे असेही आपण म्हणू शकतो. 

आपण किती शुद्धतेचे सोने खरेदी करतो आहे हे ग्राहकांना सोने खरेदी करतानाच कळणार आहे त्यांची याबाबत फसवणूक होऊ शकणार नाही. असा याचा फायदा आहे.

प्रत्येक कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्कचे नंबर निश्चित केले जातात

सराफांकडून 22 कॅरेटसाठी 916 या क्रमांकाचा वापर केला जातो. 

18 कॅरेटसाठी 750 हा क्रमांक 

आणि 14 कॅरेटसाठी 585 हा क्रमांक वापरला जातो.

या क्रमांकावरून काय समजणार ?

तुमच्या दागिन्याच्या हॉलमार्कवर 916 हा क्रमांक असेल तर तुमच्या दागिन्यामध्ये 91.6 टक्के सोने आहे. 

585 हा क्रमांक असेल तर 58.5 टक्के शुद्ध सोने वापरण्यात आले आहे.

750 असे लिहिले असेल तर 75 टक्के शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे हे समाजावे.

हॉलमार्क नसेल तर कडक कारवाई होणार* : BISच्या नियमांनुसार परवान्याशिवाय सोन्याचे दागिने विकणे किंवा नॉन हॉलमार्क दागिने विकणाऱ्या सरफांविरोधात मालाची जप्ती, पाच लाखांपर्यंत दंड आणि १ वर्ष तुरूंगवास यांची तरतूद करण्यात आली आहे.

आजपासून भारतीय ज्वेलर्स केवळ १४,१८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याचे दागिने उत्पादनांची विक्री करतील.

ग्राहक म्हणून आपण हॉलमार्क केलेले केवळ सोन्याचे दागिने खरेदी करणे आवश्यक आहे. अनिवार्य हॉलमार्किंगद्वारे, ग्राहकांना दागिन्यांची खात्री दिली जाऊ शकते. त्या दागिन्यांवर हॉलमार्कनूसार शुद्धतेची हमी दिली जाते.
close