shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहरात आदित्य जनसेवा सप्ताह पिंपरी युवासेने कडून आयोजित..!!

पिंपरी चिंचवड:-युवासेना  प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा आयोजित केला आहे. दिनांक 7 जुन ला दापोडी येथील सरवस्ती अनाथ आश्रमास अन्नधान्य वाटप करण्यात येईल. दिनांक 8जुन रोजी रोजी कासारवाडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व सेने टायजर वाटप करण्यात येईल. 

दिनांक 9जुन रोजी यशवंतराव चव्हाण रुग्णालय मध्ये फळे वाटप, दिनांक 10जून रोजी लांडेवाडी येथील गरीब व मजदूर लोकांना अन्नधान्य चे किट वाटप, दिनांक 11जून रोजी पिंपळे गुरव येथील अंध आश्रम मध्ये अन्नदाना चा कार्यक्रम, दिनांक 12जुन रोजी वाहतूक पोलीस स्टेशन भोसरी येथे मास्क व सेनेटायजर वाटप, दिनांक 13जुन रोजी दापोडी व फुगेवाडी मधील रिक्षा चालकास अन्नधान्य किट वाटप करण्यात येईल.


अश्या प्रकारे आदित्य जनसेवा सप्ताह असेल अशी माहिती पिंपरी विभाग संघटक निलेश हाके ह्यांनी दिली.
close