shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरचा कापड बाजार तिसऱ्या लाटेसाठी सज्ज..!!

करोनाला रोखणे आता नागरिकांच्या हातात.. डॉ . पारस भंडारी..

प्रतिनिधी : आसावरी वायकर

अ . नगर (दि .११) :हवेतून पसरणाऱ्या विषाणूंमुळे  महामारीच्या काळात संसंर्गाच्या लाटी येत असतात, कोवीड हाही  अश्या प्रकारचा  विषाणू  आहे, विषाणू संक्रमित लोकसंख्या  वाढली कि या लाटा वाढतात, परंतु लोकांमध्ये  विषाणूला रोखण्याची प्रतिकारक्षमता  निर्माण झाली की संसंर्गाचे रूप हंगामी होते. विषाणूंमधील बदलामुळेही संसर्गाची लाट येते तसेच कधी मानवी वर्तनही त्यास कारणीभूत  ठरते. 


संसर्गाचे प्रमाण वाढले कीं लोकांमध्ये  भीती निर्माण  होते,प्रशासन हस्तक्षेप करते.संसंर्गाचे प्रमाण कमी होते, व्यवहार सुरू होतात, अगदी त्याच वेळी नियमांचे पालन  होत नाही, आता संसंर्ग  होणार नाही असा  लोकांचा समज  होतो, लोक नियम पाळत नाही  आणि  पुन्हा संसर्गाचे प्रमाण वाढते, आपल्याला येणाऱ्या लाटा रोखायच्या असतील तर  करोना नियमांचे पालन कसोशीने करणं आवश्यक आहे. बहुसंख्य लोकांचे लसीकरण झाले  आणि प्रतिकारक्षमता वाढली कि अशा लाटा थांबतील.


तब्बल दोन  महिन्यांनतर देशात एक लाखापेक्षा कमी नवीन रूग्णांची नोंद  झाली आहे, रूग्ण बरे होण्याचा दर वाढून 95.29 टक्क्यांवर गेला आहे, बहुतांशी लोकांचे लसीकरण झाले आहे तेव्हा  धोका अजुनही टळलेला  नाही  म्हणून नियमांचे पालन कसोशीने करणे, आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, गर्दी टाळावी, उघड्यावरील अन्न टाळावे वगैरे  गोष्टीमुळे   आपण एक स्वयं शिस्त पाळणे आवश्यक आहे .सर्व  गोष्टींचे  पालन केले तरच आपण या  महामारीला  संपवून करोना मुक्त भारत घडवु शकतो.
close