shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनसेवा न्यास संचलित मोफत पोस्ट कोविड ओपीडी उद्घाटन..!!


प्रतिनिधी । सुनिल ज्ञानदेव भोसले 
पुणे । पुणे शहरात शेकडो व्यक्ती कोरोनातून बऱ्या झालेल्या आहेत. पण त्यातील काही व्यक्तींना कोरोनामुक्त होवून सुद्धा विविध प्रकारची लक्षणे व त्रास जाणवतो.

कोरोना झाल्यानंतर काही लक्षणे दिसत असल्यास किंवा काही त्रास होत असल्यास त्याला "पोस्ट कोविड आजार" असे म्हणतात.

अशा "पोस्ट कोविड" रुग्णांचे लवकर निदान होवून वेळेत उपचार मिळावे म्हणून समर्थ भारत, विवेक व्यासपीठ, रा.स्व.संघ जनकल्याण समिती, आरोग्य भारती आणि जनसेवा न्यास संचलित "मोफत पोस्ट कोविड ओपीडी" सोमवार दिनांक 7 जून 2021 पासून सुरु होत आहे. ही ओपीडी आठवड्यातून दोन दिवस चालू राहील.

वार : प्रत्येक सोमवार आणि गुरुवार

वेळ : संध्या. ४ ते ६

ठिकाण : कोद्रे हॉस्पिटल, सर्वे नंबर ४१, मुंढवा मांजरी रोड, कोद्रेनगर- केशवनगर, मुंढवा, पूणे ३६.

श्री.शिवाजीराव काटे साहेब ( पोलीस उपनिरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन) व श्री महेशजी करपे (पुणे महानगर कार्यवाह) यांच्या शुभहस्ते भारतमातेच्या पूजनाने आज शुभारंभ झाला आहे. 

या ओपीडीमध्ये डॉ श्री.नितीन शिंदे, डॉ. आबनावे यांच्याबरोबर आहारतज्ञ आणि मानसशास्त्र तज्ञ आपली सेवा येथे देणार आहेत.

तसेच आजच्या कार्यक्रमाला भाग संघचालक प्रवीणजी पाताळे, सहकार्यवाह कृष्णा चौघुले, सेवासमूह प्रमुख विजयजी शिवले, जनकल्याण समितीचे अध्यक्ष महेंद्र तूपे, कोद्रे हॉस्पिटल चे संचालक डॉ. दादा कोद्रे, जनसेवा न्यासाचे कार्यकारी विश्वस्त माधव राऊत, विश्वस्त भूषण तुपे ,अड  संजय पिंगळे ,संदिप ओव्हाळ, अजीज चौधरी, शेखर पेठकर,  नाना हिंगमिरे, नाना निकम,अर्जुन खेडकर, सुमित कोद्रे  , केदार कोद्रे इ. मान्यवर उपस्थित होते.
close